
पुणे : शहरात गुन्हेगारी वाढल्यामुळे अनेकांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी, तर काहींनी ‘स्टेटस सिम्बॉल’साठी पिस्तूल परवाना मिळविण्याचा आग्रह धरला. मात्र, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मागील साधारण दीड वर्षात या अर्जांवर फेरविचार करत कठोर धोरण अवलंबिले आहे. परिणामी १४० पिस्तूल परवाने रद्द करण्यात आले असून, चारशेहून अधिक अर्ज पोलिसांनी नाकारले आहेत. त्यामुळे आता पिस्तूल परवाना मिळविण्यासाठी पोलिसांकडे येणाऱ्या अर्जांमध्येही घट झाली आहे.