गुंजवणी पाणी संघर्ष समितीच्या लढ्यास यश.

वाजेघर,वांगणी व शिवगंगा खोरे उपसा सिंचन योजनांच्या सर्वेक्षणास 19 आँगस्ट पासुन सुरुवात.
गुंजवणी संघर्ष समिती
गुंजवणी संघर्ष समिती Sakal

नसरापूर : गुंजवणी प्रकल्पा मधुन वेल्हे तालुक्यातील वाजेघर, वांगणी व भोर तालुक्यातील शिवगंगा खोरयास पाणी उपलब्ध होण्यासाठी भोर-वेल्हे तालुका गुंजवणी पाणी संघर्ष समिती व आमदार संग्राम थोपटे यांच्या लढ्यास यश आले आहे,शासनाने या तिनही उपसा सिंचन योजनांना मान्यता दिली असुनता.19 आँगस्ट रोजी या तिनही योजनांचे सर्वेक्षण सुरु होत आहे.

गुंजवणी संघर्ष समिती
गांजाची तस्करी करणाऱ्या ; सराईत गुन्हेगारास अटक

गुंजवणी पाणी संघर्ष समितीच्या बैठकीत या बाबत माहीती देण्यात आली यावेळी आमदार संग्राम थोपटे, समिती अध्यक्ष दिनकर धरपाळे,सचिव अरविंद सोंडकर,रमेश कोंडे,ज्ञानेश्वर शिंदे,शैलेश वालगुडे,संतोष रेणुसे, प्रताप शिळीमकर,लहुनाना शेलार,दिगंबर चोरघे,बाळासाहबे गरुड,विश्वास ननावरे,अमोल नलावडे,दिनकर सरपाले,विकास कोंडे,पोपट सुके,धनंजय वाडकर,आदी सदस्य उपस्थित होते.

गुंजवणी संघर्ष समिती
औरंगाबादचा 'अर्जून' आणि 'भक्ती' कात्रजच्या प्राणी संग्रहालयात

दिनकर धरपाळे यांनी यावेळी सांगितले कि,वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पा मधुन वेल्हे व भोर तालुक्यातील वंचित राहिलेल्या भागाला पाणी मिळावे यासाठी दोन्ही तालुक्यातील सर्व पक्षीय प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्र येत गुंजवणी पाणी संघर्ष समितीच्या वतीने लढा चालु केला होता त्यास यश आले आहे मागील सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी या मागणीस तत्वता मान्यता दिली होती मात्र कृष्णा खोरे महामंडळाने प्रकल्पात अतिरिक्त पाणी साठा नसल्याने मान्यता देणे शक्य होणार नाही असा अहवाल दिला होता या नंतर आमदार संग्राम थोपटे यांनी नविन महाविकास आघाडी सरकार मधील जलसंपदा मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करुन धरणाच्या फुगवट्या मधील राखिव असणारया 0.43 टीएमसी पाण्याच्या कोट्यातुन या तिनही प्रकल्पासाठी पाणी देता येणे शक्य असल्याचे निदर्शनास आणल्यावर गुंजवणी प्रकल्पाच्या पाणी नियोजनात कोणतेही बदल न करता या मागणीस मान्यता देण्यात आली व प्रशासकीय मान्यतेच्या कार्यवाहीची सुरुवात करण्यात आली आहे योजनांचे सर्वेक्षण करुन संकल्पन करण्याच्या कामाचे टेंडर देण्यात आले आहे.

गुंजवणी संघर्ष समिती
वारजे : पार्किंगमधील दोन दुचाकी जळून भस्मसात

आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले कि,या योजनांमुळे वांगणी खोरयातील दोन चिंचळे,मांगदरी,काटवाडी, बोरावळे,वांगणी दोन निगडे अशी आठ गावे,वाजेघर खोरया मधील खाटपेवाडी,दोन्ही वाजेघर,दोन लव्ही, दादवडी,मेरवणे,आवळी,फणशी,चिरमोडी,घावर साखर अशी चौदा गावे,तर शिवगंगा खोरया मधील शिंदेवाडी, ससेवाडी,वेळु,कुसगाव,खेड-शिवापुर, खोपी,वरवे,शिवरे,श्रीरामनगर,कल्याण,रहाटवडे अशी दहा गावे अशी मिळुन 32 गावां समावेश या योजना मध्ये झाल्याने शेती व शेतकरयांची प्रगती होणार आहे यासाठी सर्वपक्षीय गुंजवणी पाणी संघर्ष समितीने एकत्रीत प्रयत्न केल्याने यश आल्याचे त्यांनी नमुद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com