Guru Pournima Celebration Pune
Sakal
पुणे : अध्यात्म, संस्कार आणि ज्ञानपरंपरेचा सन्मान करणारा गुरुपौर्णिमा उत्सव बुधवारी शहरात भक्तिभावाने साजरा करण्यात आला. विविध मंदिरे, मठ, आश्रम तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये गुरूंचे पूजन, प्रवचने, भजन-कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी दिवसभर मोठी गर्दी केली होती.