

गुरुग्राम, ता.१४ (वृत्तसंस्था) ः गुरुग्राममध्ये महिला दुचाकीस्वाराला मोटारीने धडक देऊन काही अंतर फरफटत नेल्याच्या घटनेची गुरुग्राम पोलिसांनी आज स्वतःहून दखल घेत गुन्हा दाखल केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली. पोलिसांनी या प्रकरणी ‘एफआयआर’ दाखल केल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, की व्हायरल झालेल्या व्हिडिओची गुरुग्राम पोलिसांनी स्वतःहून दखल घेत या प्रकरणी ‘एफआयआर’ दाखल केला आहे. ‘सिया’ असे नाव असलेल्या महिला बायकरने या घटनेत वकिलामार्फत ‘एफआयआर’ दाखल करून कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले. या अपघातातील कथित आरोपी कल्याण बैन्सला याची सोशल मीडियावरील प्रोफाइलवरील ओळख ‘आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू’ आणि ‘भारतीय रग्ग्बी संघाचा सदस्य’ अशी होती. तसेच त्याने ‘अमेचर ऑलिम्पिया इंडिया’ या शरीरसौष्ठव स्पर्धेचा विजेता असल्याचाही दावा केला होता. मात्र, या दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.
नेमके काय घडले?
सियाच्या दुचाकीवर बसविलेल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेला घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. ती रविवारी (ता.१३) सकाळी काही बायकरसह स्पोर्ट्स बाइकवरून गोल्फ कोर्स रस्त्यावरून जात होती. त्यावेळी एका मोटारीने बायकर गटाचा पाठलाग केला. मोटारीमधील व्यक्तींनी जवळ येऊन गैरवर्तन केल्याचे तिने सांगितले. मोटारीने सियाच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे ती रस्त्यावर पडली आणि दुचाकी काही मीटरपर्यंत घसरत गेली.
मोटारमालकाचा दावा
मोटारीचा मालक मनीष याने ही मोटार त्याची असल्याचे मान्य केले; मात्र घटनेत कोणताही सहभाग नसल्याचा दावा केला. दोन दिवसांपूर्वीच त्याने एका मित्राला मोटार दिली होती. मनीष लष्करात कार्यरत असून सध्या आसाममध्ये नियुक्तीवर आहे.मोटार घेऊन गेलेल्या मित्राचे नाव कल्याणसिंह असल्याचे सांगितले त्याने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.