esakal | इंदापूर : भादलवाडी येथे 23 लाखांचा गुटखा जप्त, तिघांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापूर : भादलवाडी येथे 23 लाखांचा गुटखा जप्त, तिघांना अटक

इंदापूर : भादलवाडी येथे 23 लाखांचा गुटखा जप्त, तिघांना अटक

sakal_logo
By
प्रा. प्रशांत चवरे, भिगवण.

भिगवण : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरुन राज्यामंध्ये प्रतिबंधित असलेला गुटखा, तंबाखुजन्य पदार्थ व पानमसाला आदी पदार्थांची अवैध्य वाहतुक करणाऱ्या तिघांना भादलवाडी (ता. इंदापूर) येथे छापा टाकून पोलिसांनी शुक्रवारी (ता. ११) दुपारी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून 23 लाख 73 हजार आठशे एकोनपन्नास रुपयांचा माल जप्त केला आहे. या प्रकरणी ज्ञानेश्वर दगडू महाकाळ (वय २७), सुनिल मारूती बिचकुले (वय २१), अमोल प्रकाश साळुके (रा. सर्व बामणी ता. सांगोला जि. सोलापूर) तसेच माल खरेदी करणार व माल विक्री करणार यांचेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार इन्कलाब रशिद पठाण यांनी फिर्याद दाखल केली आहे.

हेही वाचा: SET अर्जासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे मुदत वाढ

याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील आरोपी यांनी सध्या कोरोना रोगाने थैमान घातलेले असताना तसेच महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला व मानवी जिवीतास अपायकारक असलेले पदार्थ सुगंधीत सुपारी, तंबाखु, गुटखा आपल्या कब्जातील आयशर टेम्पोमध्ये (क्र. एम.एच.४५ ए.एफ.५४५४) शासनाच्या नियमाचे भंग करुन वाहतुक करताना आढळून आले. पोलिसांनी 13 लाख रुपये किंमतीचा आयशर टेम्पो, पाच लाख आठशे रुपयांचा गुटखा व पाच लाख 73 हजार आठशे एकोनपन्नास रुपयांच्या लोखंडी सळया असा एकुण २३ लाख ७३ हजार आठशे एकोणपन्नास रुपयांचा माल जप्त केला आहे.

हेही वाचा: पुणे, पिंपरी परिसरातील ड्रायव्हिंग स्कूलही सुरू

याप्रकरणी पाच व्यक्तींविरुध्द अन्न सुरक्षा अधिनियम २००६ व साथ रोग प्रतिबंध अधिनियम १८९७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनायक दडस करीत आहेत.