esakal | SET अर्जासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे मुदत वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

set exam

SET अर्जासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे मुदत वाढ

sakal_logo
By
अरूण मलाणी

नाशिक : महाराष्ट्र राज्‍य पात्रता परीक्षा (सेट - MH SET) करीताचे वेळापत्रक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे जारी केले होते. त्‍यानुसार अर्ज भरण्याची मुदत काल (ता.१०) संपली. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव लक्षात घेता, विनाविलंब शुल्‍क अर्ज करण्याची मुदत वाढविली आहे. त्‍यानुसार इच्‍छुक व पात्र उमेदवारांना गुरुवार (ता.१७) पर्यंत नियमित शुल्‍कासह ऑनलाइन अर्ज भरता येतील.

(Savitribai Phule Pune University extends deadline for SET application)

'सेट' अर्जासाठी आता गुरुवारपर्यंत मुदत

यासंदर्भात सेट परीक्षेचे सदस्‍य सचिव तथा पुणे विद्यापीठाचे कुलसचिव यांनी सविस्‍तर सूचनापत्र जारी केले आहे. या पत्रकात म्‍हटले आहे, की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्‍यात २६ सप्‍टेंबरला सेट परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत काल (ता.१०) पर्यंत होती. परंतु कोविड-१९ महामारीच्‍या (Covid-19 pandemic) प्रादुर्भावाचा विचार करता काही उमेदवारांना अद्याप सेट परीक्षेचे अर्ज ऑनलाइन भरणे शक्‍य झाले नाही. त्‍यामुळे विनाविलंब शुल्‍क ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत गुरुवार (ता.१७) पर्यंत वाढविली आहे. तर पाचशे रुपये इतक्‍या विलंब शुल्‍कासह १८ ते २५ जूनदरम्‍यान अर्ज करता येईल. ऑनलाइन अर्जात चुकीची माहिती भरली असल्‍यास, ती दुरुस्‍तीसाठी २६ ते ३० जून असा कालावधी निश्‍चित केला आहे.

(Savitribai Phule Pune University extends deadline for SET application)

हेही वाचा: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ‘मॉडेल आयटीआय’

हेही वाचा: नाशिकमध्ये आता दुसरा 'मॅग्नाइट मॅन'!बघण्यासाठी गर्दी