काळ्या रंगाच्या बँगेतून घेऊन चालला होता, पोलिसांनी तपासणी करताच...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 October 2020

वाघोलीतील भावडी रोड परिसरातून साडेतीन लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

वाघोली : वाघोलीतील भावडी रोड परिसरातून साडेतीन लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. विविध कंपन्यांच्या गुटख्यांचा यामध्ये समावेश आहे.

गौतम पाषाणकर प्रकरणाला वेगळे वळण; बेपत्ता होण्यामागे बड्या राजकीय व्यक्तीचा हात?

लोणीकंद पोलीस गस्त घालत असताना विक्रम डेअरी समोर एक इसम काळ्या रंगाच्या बँगेतून काहीतरी घेऊन जाताना दिसला. त्याचा संशय आल्याने पोलिसानी त्याची बॅग तपासली. त्यात गुटखा आढळून आला.

त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने ज्या ठिकाणाहून गुटखा घेतला त्या ठिकाणचा पत्ता सांगितला. पोलिसानी तिथे जाऊन पाहणी केली असता त्या इसमाच्या घरात केशर युक्त पानमसाला, विमल, व्हि 1 तंबाखू, आरएमडी, सेंटेड गोल्ड तंबाखू, राज निवास पानमसाला, एनपी 10 जर्दा जाफरानी व एक मोटार सायकल असा सुमारे साडे तीन लाख रुपये किंमतीचा गुटखा आढळून आला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या प्रकरणी पोलिसानी वसीम आक्रम मलिक (  वय 28 वर्षे, रा. एस टी कॉलनी, वाघोली, पुणे मूळ रा. हसुपुरा,बिजनुर, उत्तरप्रदेश.) युसुफ नासिर अन्सारी ( रा. भावडी रोड, वाघोली.) सलीम अब्दुलखाली मलिक ( वय 39 वर्षे, रा. भावडी रोड, वाघोली,पुणे.मूळ रा. सराई डाई, राजापूर, कोतवाली, उत्तरप्रदेश ) या तिघांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे यांच्या फिर्यादीवरून कलम 188,273,अन्नसुरक्षा व मानके अधिनियम 2006 व नियमन 2011 चे कलम 26(2),27,30(2)(i),26(2) व साथीचे रोग प्रतिबंध अधिनियम 1897 चे कलम 2,3,4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस उपनिरिक्षक हणमंत पडळकर, गुन्हे शोध पथकाचे बाळासाहेब सकाटे, श्रीमंत होनमाने, दत्ता काळे, समीर पिलाने, ऋषिकेश व्यवहारे, संतोष मारकड, सूरज वळेकर, प्रतीक्षा पानसरे यांनी ही कामगिरी केली.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gutka worth Rs 3.5 lakh seized in Wagholi