बजाज फायनान्सचा डेटा हॅक केलाय म्हणत मागितली ११.६३ कोटींची खंडणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hacker

कंपनीचा सर्व डेटा हॅक करून मोठं नुकसान करू अशी धमकी यात देण्यात आली आहे.

बजाज फायनान्सचा डेटा हॅक केलाय म्हणत मागितली ११.६३ कोटींची खंडणी

पुणे - बजाज फायनान्सचे संजीव बजाज यांच्याकडे खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यांच्याकडे ई मेलद्वारे ११ कोटी ६३ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. तसंच खंडणी दिली नाही तर कंपनीचा सर्व डेटा हॅक करून मोठं नुकसान करू अशी धमकी यात देण्यात आली आहे.

बजाज फायनान्सकडून याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुण्यात विमानतळ पोलिस ठाण्यात ई मेल पाठवणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कंपनीच्यावतीने युवराज मोरे यांनी फिर्याद दिली आहे. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी संजीव बजाज, दीपक रेड्डी, दीपक बजारी आणि संजीव जैन यांना Narasa.petrova@protomail.com या आयडीवरून मेल पाठवण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: कोरोनाचा धसका; पंतप्रधान मोदींनी रद्द केला पुणे दौरा

ई मेलमध्ये DOGE COIN च्या माध्यमातून ११ कोटी ६३ लाख २९ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. कंपनीला हा मेल २८ नोव्हेंबर २०२१ रोजी पाठवला होता. या प्रकरणी सायर पोलिस ठाण्यात तक्रारही करण्यात आली होती. याचा तपास सध्या पोलिस करत आहेत.

Doge कॉइन ही क्रिप्टो करन्सी असून ती परदेशातील दोन कम्प्युटर इंजिनिअर्सनी तयार केली आहे. या कॉइनच्या स्वरुपात ७३ लाख ९५ हजार ३७३ कॉइन मागण्यात आले होते. याची किंमत भारतीय चलनात ११ कोटी ६३ लाख २९ हजार २१७ रुपये इतकी होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :pune
loading image
go to top