पुण्यात कॉसमॉस बँकेवर हॅकर्सचा दरोडा; 94 कोटी पळविले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

याप्रकरणी सुभाष गोखले (वय 53) यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, हाँगकाँग येथील ए. एल. एम. ट्रेंडिंग लिमिटेड कंपनी आणि अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : पुण्यातील कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयाचे सर्व्हर हॅक करून तब्बल 94 कोटी 42 लाख रुपये हॅकर्सनी ट्रॅन्झॅक्शनद्वारे काढण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ही रक्कम हाँगकाँग येथील एका बँकेत वळविण्यात अाल्याचे सांगण्यात येत आहे.

याप्रकरणी सुभाष गोखले (वय 53) यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, हाँगकाँग येथील ए. एल. एम. ट्रेंडिंग लिमिटेड कंपनी आणि अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेशखिंड येथील बैंकेचे मुख्य सर्व्हर हॅकर्सने हॅक करून बँकेच्या वीसा व रूपी डेबिट कार्डधारकांची गोपनीय माहिती मिळवून कोटयवधी रुपये लाटले आहेत.

तीन दिवसांपूर्वी (11 अॉगस्ट) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास हॅकर्सनी बँकेचे सर्व्हर हॅक केले. त्यानंतर जवळपास 78 कोटी रुपयांची रक्कम भारताबाहेर ट्रॅन्झॅक्शन केली. तर 2 कोटी 50 लाखांचे ट्रॅन्झॅक्शन भारतात झाले आहे. असे एकूण 80 कोटी 20 लाख रुपये विसा आणि एन.पी.सी.आयद्वारे केलेले ट्रॅन्झॅक्शन अज्ञात व्यक्तीने अॅप्रुव्हल करून काढले. त्यानंतर सोमवारी (दि. 13) हॉकर्सनी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास हॉंगकॉंग येथील बँकेत 14 कोटी रुपयांचे ट्रॅन्झॅक्शन केले आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hackers Loot Rs 94 Crore From Cosmos Bank in Pune