हडपसर : बंटर बर्नाड शाळेसमोर डंपरने पादचाऱ्याला उडवले

अपघातानंतर बघ्यांच्या गर्दीमुळे झाली वाहतूककोंडी
Accident
Accidentesakal

पुणे : हडपसर येथील बंटर बर्नाड शाळेसमोरील रस्त्यावर डंपरने पादचाऱ्याला उडवले (Accident) आहे. डंपरचे चाक पादचाऱ्याच्या पायावरून गेल्याने पादचारी गंभीर जखमी झाला आहे. नागरिकांनी जखमी पादचारीला उपचारासाठी तातडीने ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) दाखल केले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहे. ही घटना सोमवारी (दि. २७) सकाळी 9 च्या दरम्यान घडली आहे. (Pune Accident News)

पोलिसांनी सांगितले की, अपघातानंतर सासवड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तर, पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या डंपर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघात झाल्यानंतर बघ्यांची प्रचंड गर्दी झाल्याने वाहतूककोंडी झाल्याने नागरिक हैराण झाले होते. दरम्यान, हडपसर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी डंपर बाजूला घेऊन वाहनांना रस्ता मोकळा केला.

Accident
पुणे : पत्नी-सासर्‍याच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

दरम्यान, पादचारी रस्त्यावर पडलेल्या तंबाखूची पुडी उचलण्यासाठी गेला होता. पाठीमागून एका दुचाकीने त्याला धडक दिली. यानंतर डंपरने धडक देऊन तो डंपरच्या खाली अडकला. डंपरने त्याला 30 फूट फरफटत नेले. यामध्ये पादचाऱ्यांच्या पायाचा चेंदामेंदा झाला, असे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com