

Hadapsar Bomb CCTV footage ola electric bike
esakal
Pune bomb scare news : हडपसर परिसरातील ऊषाकिरण रुग्णालयात बॉम्बसदृश्य वस्तू ठेवणारा संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आरोपी इलेक्ट्रिक ओला वाहनातून रुग्णालयात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, त्याने अतिदक्षता विभागाच्या (ICU) बाजूला असलेल्या पुरुष स्वच्छतागृहात ही संशयास्पद वस्तू ठेवली असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर रुग्णालय परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.