
पुण्यातील हडपसर परिसरातील शिंदे वस्ती येथे म्हशींचे गोठे असल्याने रस्त्यांवर शेण साठवण्याची समस्या गंभीर बनली होती. या अस्वच्छतेमुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पुणे महानगरपालिकेने तपासणी करत तीन दूधविक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला. या प्रकरणी महाराष्ट्र महापालिका अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले.