अमेरिकेत होणाऱ्या "रॅम' या स्पर्धेमध्ये हडपसरच्या दशरथ जाधव यांचा प्रवेश निश्चित | Dashrath Jadhav | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dashrath jadhav
अमेरिकेत होणाऱ्या "रॅम' या स्पर्धेमध्ये हडपसरच्या दशरथ जाधव यांचा प्रवेश निश्चित

अमेरिकेत होणाऱ्या "रॅम' या स्पर्धेमध्ये हडपसरच्या दशरथ जाधव यांचा प्रवेश निश्चित

हडपसर - भारतातील सायकलिंग स्पर्धांमध्ये सर्वात अवघड समजली जाणाऱ्या डेक्कन क्लिफ हँगर सायकल स्पर्धेत पन्नास वर्षावरील वयोगटात हडपसर येथील उद्योजक दशरथ जाधव यांनी प्रथम क्रमांक मिळविला. पुणे ते गोवा या ६४६ किलोमीटर अंतराची ही स्पर्धा जाधव यांनी ३० तास २५ मिनिटे अशा रेकॉर्ड वेळेत पूर्ण केली.

पुणे ते गोवा या मार्गात कात्रज, खंबाटकी, पसरणी, तवंदी व चोर्ला या घाटातून प्रवास करावा लागतो. पुणे, पाचगणी, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, बेलूर, चोरला घाट मार्गे गोवा असा मार्ग होता. ही स्पर्धा पूर्ण करताना जाधव यांना ऊन, वारा आणि पाऊस अशा सर्व प्रकारच्या वातावरणाचा सामना करावा लागला. स्पर्धकांच्या शारीरिक क्षमतेचा कस पाहणारी ही स्पर्धा असून फक्त शारीरिक नाही तर मानसिक फिटनेस चा देखील कस या ठिकाणी महत्वाचा मानला जातो. जे स्पर्धक ही स्पर्धा बत्तीस तासांमध्ये पूर्ण करतील त्यांना अमेरिकेत होणाऱ्या जगातील सर्वात अवघड अशा "रोड अक्रॉस अमेरिका' या सायकल स्पर्धेमध्ये सहभाग घेता येतो. जाधव यांनी सलग दुसऱ्यांदा ही स्पर्धा वेळेत पूर्ण करून अमेरिकेत होणाऱ्या "रॅम' या स्पर्धेमध्ये प्रवेश मिळविला आहे.

हेही वाचा: पाणीप्रश्नाच्या पाठींब्यासाठी केला जातोय लग्नपत्रिकेचा वापर

यापूर्वी या स्पर्धेत सहभागी झालेले डॉ. चंद्रकांत हरपळे, देविदास होले, रणधीर टकले, स्वप्नील धर्मे, मंगेश रवळेकर, वैभव पिलाने, किशोर मोरे यांनी जाधव यांना ही स्पर्धा पूर्ण करताना क्रू टीम म्हणून सहभाग घेतला. जाधव यांनी आता पर्यंत सहा वेळा आयर्नमॅन होण्याचा विक्रम केला आहे. जाधव त्यांनी सर्व प्रकारच्या फिटनेस खेळांमध्ये मध्ये अनेक विक्रम करून हडपसरचे नाव देश पातळीवर पोहचविले आहे.

"कोणताही विक्रम करण्यासाठी नाही तर स्वतःला समाधानी करण्यासाठी मी अशा विविध स्पर्धा मध्ये भाग घेतो. स्पर्धा जिंकणे हा माझा उद्देश नसून तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण होऊन त्यांनी विविध ठिकाणी यश मिळवावे, या साठी मी प्रयत्न करत आहे",

- दशरथ जाधव

loading image
go to top