
Pune Water Shortage
esakal
पुणे : महापालिकेच्या पाणीपुरवठ्यामध्ये असणाऱ्या असंख्य त्रुटी, अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा होण्यास येणाऱ्या अडचणी, अशा अनेक कारणांमुळे हडपसर व परिसरातील महंमदवाडी, केशवनगर व इतर गावांमध्ये पाणी समस्या गंभीर आहे. धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही पाणी मिळत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून संबंधित परिसराला नियमित व पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा व्हावा, यासाठी किरकोळ स्वरूपाच्या उपाययोजना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.