
Hadapsar Rain
Sakal
हडपसर : परिसरामध्ये आज दुपारी तीन वाजल्यापासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने हडपसरकरांची दाणादाण उडवली. कामावरून घरी परतणारे नोकरदार, तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना यामुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. ठिकठिकाणच्या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचले होते. त्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना व पादचाऱ्यांनाही मोठी कसरत करावी लागली.