
हडपसर : टँकर पॉईंटमुळे रात्रंदिवस रस्त्यावरून वाहणारे पाणी, त्यामुळे रस्त्याची झालेली दुरवस्था व वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासनाकडून होणारे दुर्लक्ष, यामुळे रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील उद्योजक हैराण झाले आहेत. विकास आराखडा होऊन दहा वर्षे उलटून गेली, तरीही सुविधा मिळत नसल्याने येथील उद्योजकांनी पालिका प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.