Hadapsar Robbery : 'अपघाताचे नाटक' करून ट्रकचालकाला लुटले; हडपसरच्या मगरपट्ट्यातील घटनेत तीन चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Pune Truck Driver Robbed in Hadapsar : हडपसरमधील मगरपट्टा परिसरात अपघात झाल्याचे खोटे सांगून ट्रकचालकाला धमकावून लुटणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : अपघात झाल्याची बतावणी करून चोरट्यांनी ट्रकचालकाला धमकावून लुटल्याची घटना सोमवारी (ता. २४) मध्यरात्री हडपसरमधील मगरपट्टा परिसरात घडली. चालकाला लुटणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे.