

Pune Suicide Case Under Investigation After Note Found
Esakal
पुण्यात एका ५६ वर्षीय व्यक्तीनं आत्महत्या केल्याची घटना घडलीय. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत एका उमेदवारावरच आरोप करत व्यक्तीनं आयुष्य संपवल्यानं खळबळ उडालीय. हडपसरमध्ये एक उमेदवार त्रास देत असल्याचा आरोप आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीनं सुसाइड नोटमध्ये केलाय. लष्कर भागात त्यांच्या ऑफिसमध्येच गळफास घेत आयुष्य संपवलं असून या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.