हडपसरला पुढच्या टप्प्यात मेट्रो

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

हडपसर - ‘‘पुढच्या टप्प्यात हडपसरला नक्कीच मेट्रो आणली जाईल. ससाणेनगर येथील भुयारी मार्ग अभ्यासपूर्वक उभारला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात भुयारी मार्गासाठी निधी नेमका कोठे खर्च झाला, याचा शोध घेऊ,’’ असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. 

ससाणेनगर-सय्यदनगर येथे रेल्वे फाटकाजवळ होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी भुयारी मार्गाचे भूमिपूजन नुकतेच झाले. या वेळी ते बोलत होते. आमदार योगेश टिळेकर, नगरसेवक उज्वला जंगले, रंजना टिळेकर, नगरसेवक संजय घुले, वीरसिंह जगताप, सुभाष जंगले, भूषण तुपे, संदीप शेंडगे, वैभव माने, राजू केकाण आदी उपस्थित होते. 

आमदार टिळेकर म्हणाले, ‘‘वाहतूक कोंडी फुटत नसल्याने हे दोन भुयारी मार्ग करण्याचा निर्णय घेतला. खासदार आढळराव पाटील मला पोरकट म्हणतात; पण मी मांजरीचा उड्डाण पूल, लुल्लाणनगरचा पूल मंजूर करून घेऊन त्यासाठी निधी आणला. हा पोरकटपणा असेल, तर मी तो वारंवार करीत राहील.’’ 

श्रेय लाटण्यासाठी भूमिपूजन - ससाणे
भुयारी मार्गाचे भूमिपूजन महापालिकेतर्फे करण्यात आले नाही. आमदार टिळेकर यांनी या कामाचे श्रेय लाटण्यासाठी हे भूमिपूजन केले, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेश ससाणे यांनी केला. महापालिका सभागृहात या कामाचे अधिकृत भूमिपूजन करण्यात यावे, याबाबतचा ठराव मांडण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

नगरसेवकांची अनुपस्थिती
भाजप नगरसेवक, कार्यकर्ते आणि विरोधी पक्षांचे नगरसेवक या कार्यक्रमाला गैरहजर होते. भाजपचे नगरसेवक मारुती तुपे, ॲड. विकास रासकर, जीवन जाधव, माउली कुडले हे या कार्यक्रमाला गैरहजर होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका वैशाली बनकर, नगरसेवक आनंद आलकुंटे, योगेश ससाणे, नंदा लोणकर, शिवसेनेचे नगरसेवक नाना भानगिरे, प्राची अल्हाट हेदेखील 
या वेळी अनुपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hadapsar Metro in Second Step