Pune Palkhi procession traffic arrangements
esakal
हडपसर (पुणे) : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज असा दोन्ही संतांचा पालखी सोहळा शनिवारी (ता. ११) हडपसर येथून पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे. हा सोहळा शहरातून ग्रामीण हद्दीत प्रवेश करणार असल्याने याठिकाणी दर्शन घेवून निरोप देण्यासाठी शहर व परिसरातून मोठ्याप्रमाणात भाविक येत (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi departure from Hadapsar) आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका व पोलिस प्रशासनाकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. भाविकांना अधिकाधिक सुरक्षित, स्वच्छ वातावरणात व सुलभपणे दर्शन मिळून प्रस्थान सोहळ्याचा आनंद घेता यावा यादृष्टीने नियोजनबध्द व्यवस्था करण्याचा प्रयत्न येथे करण्यात आला आहे.