Breaking : पुण्यात मोठा शस्त्रसाठा जप्त; ६ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 September 2020

शहरात हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या घरफोडी, चोरी आणि अन्य गुन्ह्यांबाबत तपास करण्याचे उद्दीष्ट बावचे यांनी हदपसर पोलिसांना दिले होते, त्यानुसार पोलिस तपास करीत होते.

पुणे : शस्त्रांची तस्करी, विविध प्रकारचे गुन्हे करण्यासाठी आणि विक्री करण्याच्या उद्देशाने तब्बल 18 गावठी बनावटीचे पिस्तुल, 28 जिवंत काडतुसे असा मोठा शस्त्रसाठा हडपसर पोलिसांनी जप्त केला. हा शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी 6 सराईत गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्याकडून साडे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुण्यात इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

मृत्यूनंतरही होतेय फरफट; प्रशासनाच्या लहरीपणामुळे अंत्यविधीला लागले सोळा तास​

अरबाज रशिद खान (वय 21, रा. गंगा फेज बिल्डिंग, शिरुर), सूरज रमेश चिंचणे (वय 22, रा.गंगानगर, फुरसुंगी, हडपसर), कुणाल नामदेव शेजवळ (वय 19, रा. बुरुड आळी, शिरुर), जयेश राजू गायकवाड (वय 23, रा. लाटे आळी, शिरुर), विकास भगत तौर उर्फ महाराज (वय 28, लक्ष्मीनगर, येरवडा), शरद बन्सी मल्लाव (वय 21, रा. काचे आळी, शिरुर) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. परीमंडळ 5 चे पोलिस उपायुक्त सुहास बावचे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. यावेळी हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे, पोलिस निरीक्षक हमराज कुंभार उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे प्रकल्पाला झाला विलंब; भाजप नेत्याचा आरोप​

शहरात हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या घरफोडी, चोरी आणि अन्य गुन्ह्यांबाबत तपास करण्याचे उद्दीष्ट बावचे यांनी हदपसर पोलिसांना दिले होते, त्यानुसार पोलिस तपास करीत होते. त्यावेळी हडपसरमध्ये काही तरुण बेकायदा पिस्तुल बाळगत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून 18 पिस्तुल आणि 28 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांनी या शस्त्राचा वापर विविध प्रकारचे गुन्हे करण्यासाठी आणि विक्रीसाठी करत असल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच अन्य काही उद्देश आहेत का? याचीही चौकशी केली जात असल्याचे बावचे यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hadapsar police arrested 6 criminals for carrying large arms