राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे प्रकल्पाला झाला विलंब; भाजप नेत्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 September 2020

राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी पुणे आणि पिंपरीला भामा-आसखेडचे पाणी देणार नाही, अशी सरळसरळ धमकी दिली आहे. भामा-आसखेड योजनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकवाक्यता नाही.

पुणे : राज्यात भाजपची सत्ता असताना पाच वर्षांत भामा-आसखेड पाणी प्रकल्पाचे ९५ टक्के काम पूर्ण करण्यात आले, मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अंतर्गत वादामुळे ही योजना पूर्ण होण्यास विलंब होत असून गेल्या वर्षभरात उर्वरीत ५ टक्के काम करण्यात सरकारला अपयश आले आहे, असा आरोप भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सोमवारी (ता.२१) केला. मात्र, पुणेकरांना भामा-आसखेडचे पाणी देण्यास भाजप कटिबद्ध असून, त्यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

मृत्यूनंतरही होतेय फरफट; प्रशासनाच्या लहरीपणामुळे अंत्यविधीला लागले सोळा तास​

मुळीक म्हणाले, ''राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी पुणे आणि पिंपरीला भामा-आसखेडचे पाणी देणार नाही, अशी सरळसरळ धमकी दिली आहे. भामा-आसखेड योजनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकवाक्यता नाही. स्थानिक आमदार केवळ बैठका घेण्याचा फार्स करीत आहेत. प्रत्यक्षात प्रकल्प पूर्ण करण्याच्या उद्देशाने कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत. खरंतर आत्तापर्यंत पुणे-नगर रस्त्यावरील नागरिकांना भामा-आसखेडचे पाणी मिळाले असते. परंतु नियोजनाचा अभाव आणि स्थानिक आमदारांच्या राजकीय उदासिनतेमुळे प्रकल्प पूर्ण करण्यात अपयश आले आहे.''

कृषी योजनांना मुहूर्त सापडला; शेतकर्‍यांनो, उचला मोबाईल अन् करा ऑनलाईन अर्ज!​

मुळीक पुढे म्हणाले, ''वडगावशेरी, चंदननगर, कळस, धानोरी, विश्रांतवाडी, येरवडा या शहराच्या पूर्व भागातील पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी सात वर्षांपासून भामा-आसखेड योजनेचे काम सुरू आहे. या प्रकल्पाची क्षमता २०० एमएलडी इतकी आहे. योजनेचा खर्च सुमारे ४१८ कोटी रुपये आहे. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर योजनेला आवश्यक असणारा महापालिकेच्या वाट्याचा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे योजनेला गती आली. मात्र, योजनेतील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्यात राज्यातील महाआघाडी सरकारला अपयश येत आहे. त्यामुळे प्रकल्पाला विलंब होत आहे.''

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader Jagdish Mulik alleged that Bhama Askhed scheme delayed due to internal disputes within NCP