Pune News: चारचाकीसाठी पाच लाखांचा तगादा; चार महिन्यांतच नवविवाहित आयटी इंजिनिअरने जीवन संपवलं

Pune Dowry Case Over Five Lakh Rupee Car Demand Under Probe: हुंड्यासाठी चारचाकीची मागणी, मानसिक-शारीरिक छळाच्या कचाट्यात अडकलेल्या नवविवाहित आयटी इंजिनिअरचा गळफास घेऊन मृत्यू; पती-सासू-सासऱ्यांवर गुन्हा दाखल
Pune Dowry Case IT Engineer Dies by Suicide Four Months After Marriage Amid Alleged Five Lakh Rupee Car Demand

Pune Dowry Case IT Engineer Dies by Suicide Four Months After Marriage Amid Alleged Five Lakh Rupee Car Demand

esakal

Updated on: 

-कृष्णकांत कोबल

हडपसर : चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरकडून पाच लाख रुपये आणावेत, अशी मागणी करीत छळ केल्याने अवघे चार महिन्यापूर्वी लग्न झालेल्या आयटी इंजिनियर विवाहितेने राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गुरुवारी (ता.२४) रात्री ही घटना घडली. वैष्णवी ओंकार गिसरे (वय २३, रा. वृंदावन सोसायटी, वडाचीवाडी, पुणे) असे या महिलेचे नाव असून तिचे वडील प्रवीण रघुनाथ जरांडे (वय ५१, या. कोडीत खुर्द, ता. पुरंदर, जि. पुणे) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात तिचे पती व सासू-सासर्‍यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com