
हडपसर रेल्वे स्टेशन प्रवाश्यांची होतेय गैरसोय !
मुंढवा : पुणे स्टेशनला पर्याय म्हणून हडपसर रेल्वे स्थानक कार्यान्वित करण्याचे रेल्वेने ठरविले आहे. गेल्या काही दिवसापासून बंद असलेली पुणे- हैद्राबाद रेल्वे येथून शुक्रवारी ९ जुलै रोजी हडपसर रेल्वे स्थानकावरून हैदराबाद साठी विशेष गाडी रवाना झाली होती. ती आठवड्यातून रविवार, मंगळवार व शुक्रवार तीन दिवशी धावत आहे. सकाळी साडेदहा ते अकराच्या दरम्यान येणाऱ्या गाडीतून पुण्यात येणाऱ्या प्रवाश्यांची भरपूर गर्दी असते. परंतु हडपसर रेल्वे स्टेशनवर आल्यावर प्रवाश्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
रेल्वे स्थानकाचे काम अपुर्ण आहे. प्लॅटफार्म २ व ३ वर पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृह व शौचालयाचे काम झालेले नाही. वेटिंग रूम नाही, कॅन्टीन ची सुविधा नाही. प्लॅटफार्म अपुर्ण अवस्थेत आहे. पार्कींगसाठी जागा नाही, रेल्वे स्थानकासमोरील रस्ता अतिशय अरूंद आहे. जेष्ठ नागरिकांना सामानासहित जिना चढून येणे जिकीरीचे आहे. या असुविधांमुळे प्रवाशी हैराण झाले आहेत. हडपसर रेल्वे स्थानकावर उतरलेल्या प्रवाश्यांना निगडी भोसरी, पुणे स्टेशन, चांदणी चौक व मांजरी अशा विविध ठिकाणी
हेही वाचा: संतोष जगताप खून प्रकरणातील जखमी अंगरक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू
अशा विविध ठिकाणी जायचे असते पण येथून बस किंवा रिक्षाची पुरेशी संख्या नसल्याने त्यांना तासन तास ताटकळत थांबावे लागते. कुठे जायचे ते कळत नाही. रेल्वे स्थानकावरून ताडीगुत्ता चौक, मुंढवा तुलसी हॉल चौक, महात्मा फुले चौक या ठिकाणी सामान घेवून सुमारे एक किलोमीटर चालत जावे लागते.
प्रवाश्यांच्या प्रतिक्रीया :
रेल्वे स्थानकावर पाणी, टॉयलेट, सुविधा नाहीत. पुणे मेट्रोपॉलिटीयन सिटी असल्यासारखे वाटत नाही. येथून पुणे स्टेशनला जाणेसाठी बस किंवा लोकल सुरू केल्यास प्रवाश्यांसाठी सोयीचे होईल.- नाकेश नाकाडे
हे पुण्यातील रेल्वे स्टेशन वाटत नाही. येथे प्रवाश्यांना थांबायला जागा नाही. ना अॅटो ना बस हे तर एखाद्या तालुक्याच्या ठिकाणचे रेल्वे स्टेशन वाटते. पुण्यातील प्रवाश्याना हैद्राबादला जाताना हडपसर रेल्वे स्टेशन गाठावे लागत आहे. - बसवराज बिराजदार
रेल्वेने या ठिकाणी जेष्ठ नागरिक प्रवाश्यांची पर्वा केलेली नाही. त्यांना जिन्यावर मोकळे चढणे शक्या नाही. मग सामान घेवून कसे चढतील. येथे जिन्यावर चढण्यासाठी एक्सकलेदिटर नाही.दुर जायचे म्हटल्यास रिक्शावाले भाडे नाकारतात. ओला गाड्यांना हडपसर रेल्वे स्थानकावर येण्यास सांगितले तर नाव ऐकून टाळाटाळ करतात.- सागर माडच्चेट्टी
रेल्वे स्थानकावरून जाण्यासाठी बसची व्यवस्था नाही. पुण्यात जाण्यासाठी रिक्शावाले अडवणूक करून अधिक पैश्याची मागणी करतात. बरोबर कुटूंब असल्यामुळे तेवढे पैसे द्यावेच लागतात. - तानाजी साळुखे
याबाबत रेल्वेचे वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक एस.एस मिश्रा यांना दोन वेळा फोनवरून संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
Web Title: Hadapsar Railway Station Inconveniences Passengers
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..