

Two youths killed in separate road accidents in Hadapsar Pune
sakal
पुणे : हडपसर परिसरात वाहनचालकांच्या बेफिकीरपणामुळे दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. साडेसतरानळी रस्त्यावर पादचारी तरुणाला मोटारीने चिरडले, तर पुणे-सोलापूर महामार्गावरील उड्डाणपुलावर भरधाव वाहनाने दुचाकीस्वाराला धडक दिली. अपघातांनंतर वाहनचालक पसार झाले असून, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.