Palkhi Sohala : हडपसरमध्ये ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत

हडपसर पंचक्रोशीतील भाविकांनी टाळमृदंगाच्या तालावर हरिनामाचा जयघोष व रांगोळीच्या पायघड्या टाकीत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या या पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत केले.
Palkhi Sohala
Palkhi Sohalasakal

हडपसर - पंढरीसी जारे आल्यानों संसारा l

दीनाचा सोयरा पांडुरंग ll

वाट पाहे उभा भेटीची आवडी l

कृपाळू तातडी उतावीळ ll

दीनाचा सोयरा असलेल्या पांडुरंग भेटीचा असा महिमा वर्णन करीत पंढरीला निघालेला वैश्नव सोहळा काही काळासाठी हडपसर गाडीतळ येथील विसावास्थळी विसावला होता. पंचक्रोशीतील भाविकांनी टाळमृदंगाच्या तालावर हरिनामाचा जयघोष व रांगोळीच्या पायघड्या टाकीत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या या पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत केले.

आज (ता. १४) सकाळी पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा तर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा गाडीतळ येथील विसावास्थळी दाखल झाला. खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, माजी आमदार योगेश टिळेकर, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, उपायुक्त संदीप कदम, सहाय्यक आयुक्त प्रसाद काटकर, पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, अजित लकडे, शिंदे गट शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे, जिल्हाप्रमुख उल्हास तुपे, ठाकरेगट शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देशमुख, माजी महापौर वैशाली बनकर, माजी नगरसेवक योगेश ससाणे, सुनील बनकर, उज्वला जंगले, अमर तुपे, संदीप बधे, संजीवनी जाधव, प्रशांत घुले, अमोल हरपळे, संजय शिंदे, सागर राजेभोसले, राहुल तुपे, सविता मोरे, दिपाली कवडे, मनीषा राऊत, अविनाश काळे आदींनी पालख्यांचे उत्साहात स्वागत केले.

संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी गाडीतळ बसथांबा चौकात विसावली होती. संस्थानकडून पारंपरिक पूजा करण्यात आली. यावेळी भाविकांनी रांगेत दर्शनाचा लाभ घेतला. माऊली माऊलीच्या जयघोषात परिसर दणाणून गेला होता. खासदार डॉ. कोल्हे व आमदार तुपे पाटील यांनी यावेळी फुगडीच्या गिरक्या घेतल्या. यानंतर थोड्याच वेळात पालखी सोहळ्याने उत्साही वातावरणात व हरिनामाच्या जयघोषात साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.

Palkhi Sohala
Pune Development Plan : पुणे विकास आराखड्यास सहा महिने मुदतवाढ

गाडीतळ येथेच सोलापूर महामार्गावर जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पालखीसोहळा विसावला. खासदार डॉ. कोल्हे व आमदार तुपे पाटील यांनी पालखीला खांदा देऊन विसावास्थळी आणली. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी स्वागत केले. पालखी सोहळ्यातील मुख्य पुजारी संतोष वैद्य यांनी पारंपरिक पूजन केले.

वडगावशेरी येथील कलासंस्कृती ग्रूपच्या वतीने विसावा स्थळालगत पस्तीस फूटी आकर्षक रांगोळी काढली होती. हर्षवर्धन हरपळे, सुशांत काळोखे नामदेव निकरम, मोहन बिलई दयानंद सणस, कृतीक सणस, मयूर आखाडे, इसाक शेख, गौतम सरडे, बाळासाहेब केमकर, यशवंत चव्हाण व हडपसर ग्रामस्थ भजनी मंडळाने या ठिकाणी सेवा दिली.

Palkhi Sohala
Zp Recruitment : पुणे जिल्हा परिषदेतील कर्मचारी भरतीला अडथळा ‘सॉफ्टवेअर’चा

सुमारे दोन तास संत तुकाराम महाराज पालखी विसावास्थळी होती. हडपसरसह मुंढवा, केशवनगर, चंदननगर खराडी, मांजरी बुद्रुक, महंमदवाडी, उंड्री, हांडेवाडी परिसरातील भाविकांनी रांगेत पादुकांचे दर्शन घेतले. दरम्यान दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पुंडलिक वरदेव हरिविठ्ठलाच्या गजरात सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला.

पोलीस व पालिका प्रशासनातील सुमारे दीड हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या भागात सोहळ्याचे नियोजन केले. स्थानिक कार्यकर्त्यांमधील किरकोळ वादावादीचा प्रकार वगळता दोन्हीही पालखी सोहळे शांततेत व नामघोषात मार्गस्थ झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com