

Sasanenagar canal bridge remains dangerous as repair work delayed
Sakal
हडपसर : ससाणेनगर रस्त्याच्या नव्या कालव्यावरील पूल धोकादायक झाल्याचे उघड होवून तीन महिने उलटून गेले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिकेने पुलावरील काही भागावर पत्रे लावून वाहतूक एकेरी केली आहे. मात्र, पुलाच्या दुरूस्तीच्या कामाला अद्यापही सुरुवात झाली नसल्याने प्रवाशांना धोकादायकपणे प्रवास करावा लागण्यासह वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागत आहे. येथील नव्या मुठा कालव्यावरील पुलाचा एक खांब ढासळला आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीला धोकादायक झाला आहे. हा धोका लक्षात घेवून पालिकेने तकलादू झालेल्या खांबावरील रस्त्याच्या भागात पत्रे लावून रस्त्यावरील भागात वाहतुकीला वळण दिले आहे.