
पुणे : पुणे स्टेशनवरून संपूर्ण भारतात लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या धावतात. पण हे स्टेशन त्यासाठी अपुरे पडत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून हडपसर स्टेशनवरून गाड्या सोडण्यास सुरुवात केली आहे. पण या स्टेशनला जाणारे रस्ते हे अरुंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे लक्षात आल्याने पुणे महापालिकेकडून तीन रस्त्यांचे रुंदीकरण करण्यासाठी प्रक्रिया सुरु केली आहे. यातील काही रस्ते हे रेल्वेच्या जागेतून जात असल्याने महापालिकेने रस्ते करण्याची परवानगी मागितली आहे.