
हडपसर : हडपसर ॲथलेटिक्स क्लबने सलग दहाव्या वर्षी पुणे-पंढरपूर-पुणे अशी ४२० किलोमीटर सायकल वारी आयोजित केली होती. या सायकल वारीमध्ये जवळपास ८० सायकलपटू सहभागी झाले होते. नेहमीप्रमाणेच यावर्षीही सायकलवारीला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. यात महिलांचाही सहभाग लक्षणीय होता.