

Hadapsar Traffic
sakal
हडपसर : अरुंद रस्ता आणि त्यात अतिक्रमण यामुळे रविदर्शन चौक ते शेवाळेवाडी फाटा तसेच, त्यापुढे कवडीपाट हद्दीपर्यंत सोलापूर महामार्गावर सततच्या वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. याकडे वाहतूक पोलिस विभाग आणि महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभाग यांचे दुर्लक्ष होत असल्याने ही समस्या दिवसेंदिवस जीवघेणी ठरत आहे.