
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना फरार काळात मदत करणाऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत. हगवणेंनीं फरार काळात ज्या थार गाडीतून प्रवास केला ती संकेत चोंधे आणि सुय़श चोंधे यांच्या मालकीची आहे. या दोघांपैकी सुयशवर त्याच्या पत्नीनेही गंभीर आरोप केले आहेत. अश्लील व्हिडीओ दाखवून जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवत असे असा आरोप पत्नीने केलाय. दरम्यान, संकेत चोंधेबाबतही आता पोलिसात तक्रार दाखल झाली आहे.