
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील एक महत्त्वाचा आरोपी निलेश चव्हाण गेल्या ८ दिवसांपासून फरार आहे. पोलिसांनी राज्यभरातच नव्हे तर देशभरात त्याचा शोध सुरू केला आहे. अनेक ठिकाणी पोलिसांची ४ पथके रवाना करण्यात आली आहेत. तर दुसरीकडे आरोपी हगवणे कुटुंबियांना आज कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. यातच आता हगवणेंच्या वकिलांनी निलेश चव्हाणबाबत मोठे वक्तव्य केले आहे. यानंतर आता चर्चांना उधाण आले आहे.