Hail Warning : पुणे जिल्ह्यात आज गारपिटीचा इशारा ; कमाल तापमानाचा पारा ३७.८ अंशांपर्यंत खाली

पुणे जिल्ह्यासह सातारा, लातूर आणि नांदेड येथील काही भागांत रविवारी (ता. १२) गारपीट होईल, असा ‘ऑरेंज अलर्ट’ हवामान विभागाने शनिवारी (ता. ११) दिला.
Hail Warning
Hail Warningsakal

पुणे : पुणे जिल्ह्यासह सातारा, लातूर आणि नांदेड येथील काही भागांत रविवारी (ता. १२) गारपीट होईल, असा ‘ऑरेंज अलर्ट’ हवामान विभागाने शनिवारी (ता. ११) दिला. शहरात सोमवारी (ता. १३) लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्या दिवशी आकाश अंशतः ढगाळ राहून मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे, असे विभागाने सांगितले.

शहरात उन्हाचा प्रचंड चटका बसत होता. कमाल तापमान सातत्याने सरासरीपेक्षा जास्त नोंदले जात होते. शुक्रवारी (ता. १०) दुपारनंतर बरसलेल्या वळिवाच्या पावसामुळे उन्हाच्या झळांपासून काही अंशी पुणेकरांना दिलासा मिळाला. या महिन्यातील आतापर्यंतच्या सर्वांत नीचांकी कमाल तापमानाची नोंद शनिवारी पुणे वेधशाळेत झाली. कमाल तापमानाचा पारा सरासरीपर्यंत खाली येऊन ३७.८ अंश सेल्सिअस नोंदला गेला.

किमान तापमानात घट

शहर आणि परिसरात शुक्रवारी दुपारी झालेल्या दमदार पावसामुळे किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा १.१ अंश सेल्सिअसने कमी होऊन २१.२ अंश सेल्सिअस नोंदला गेला. त्यामुळे रात्रीच्या उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना काही अंशी दिलासा मिळाला.

राज्यात वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा :

राज्यातील बहुतांश भागाला वळिवाच्या पावसाने तडाखा दिला असून रविवारीही (ता. १२) पावसाच्या सरी कोसळण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी गारपिटीचाही इशारा दिला आहे. पावसाळी वातावरणामुळे उन्हाच्या चटक्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्यात अकोला येथे सर्वाधिक म्हणजे ४२.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. जळगाव (४१.७ अंश सेल्सिअस), अमरावती (४१), ब्रम्ह्मपुरी (४०.९), चंद्रपूर (४२), वाशीम (४१.४), वर्धा (४१.५) आणि यवतमाळ (४०) येथे कमाल तापमानाच्या पाऱ्याने चाळिशीपार उसळी मारली होती.

Hail Warning
Pune Rain : पुण्यात दहा वर्षांतील सर्वाधिक वळीव

कमी दाबाचा पट्टा सक्रिय :

आग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे; तर मराठवाड्यापासून कर्नाटक, केरळ ते कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात वळिवाच्या पावसाला सुरुवात झाली असून रविवारी राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

गारपीट, वादळी पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट)

पुणे, सातारा, लातूर, नांदेड.

मुसळधार पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com