

Farmers Hit Hard: Sudden Rain and Intense Hailstorm Damage Orchards
sakal
पुणे: राज्यात मंगळवारी (ता. १७) रात्री पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावत सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, धाराशिव, हिंगोली आदी जिल्ह्यांना तडाखा दिला. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने काढणीच्या टप्प्यावर आलेल्या रब्बी पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.