Half a Ton of Sweets Destroyed! FDA Cracks Down on Sweet Traders in Budhwar Peth Area
sakal
पुणे - बुधवार पेठ परिसरातील मिठाई व्यावसायिकांवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शुक्रवारी (ता. २७) जोरदार कारवाई केली. अस्वच्छता आणि विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या आठ व्यावसायिकांची तपासणी करून ५१२.१ किलो मिठाई जप्त केली. सुमारे २ लाख ८८ हजार २०० रुपये किमतीचा हा साठा नाशवंत असल्याने जागेवरच नष्ट करण्यात आला.