आमदार संजय शिंदेंविरुध्द आक्रमक शेतकऱ्यांचे आंदोलन

आमदार संजय शिंदेंविरुध्द आक्रमक शेतकऱ्यांचे आंदोलन

आमदार संजय शिंदे यांनी काढले १५०० शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज

बँकेने कारवाई नाही केली तर ईडी कार्यलयासमोर उपोषण करणार अतुल खुपसे

पुणे : पंजाब बँकेसमोर आज करमाळयामधील शेतकरी आक्रमक होत भीक मागत अर्धनग्न आंदोलन केले आहे. ''जर संजय शिंदे वर कारवाई झाली नाही तर ईडी कार्यलयासमोर उपोषण करण्याचा इशारा'' अतुल खूपसे यांनी दिला आहे. करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांच्या मालकीच्या म्हैसगाव येथील विठ्ठल कार्पोरेशन साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्जे उचलल्याचा प्रकार समोर आला.

आमदार संजय शिंदेंविरुध्द आक्रमक शेतकऱ्यांचे आंदोलन
कुटुंब तर सोडा, माझं लहान लेकरूही एकदाच जेवतेय !

विठ्ठल कॉर्पोरेशन साखर कारखान्याकडून २०१३ मध्ये खत देतो म्हणून, आधार कार्ड, मतदान कार्ड तसेच सातबारा उतारा आणि अनेक ठिकाणी सह्या घेण्यात आल्या मात्र, संबंधित शेतकऱ्यांना खत मिळाले नाही. २०१३ पासून आतापर्यंत कारखाना आणि बँकेची कोणतीही नोटीस कर्ज भरण्यासंदर्भात आली नाही. मात्र, २९ मेनंतर पंजाब नॅशनल बँकेच्या वकिलांकडून पोस्टाने नोटीस पाठवून कर्जाची रक्कम २ मे पर्यंत भरावी अन्यथा, फौजदारी कारवाई करावी लागेल. असा इशारा वकिलामार्फत पाठविलेल्या नोटिशीत देण्यात आला. त्यानंतर शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्जे उचलल्याचा प्रकार समोर आला.

आमदार संजय शिंदेंविरुध्द आक्रमक शेतकऱ्यांचे आंदोलन
दिलासादायक! पुण्यात नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या जास्त

काढलेली कर्ज वेळेत न भरल्याने ती कर्ज भरण्यासंदर्भात पुण्यातील कोथरूडमधील पंजाब नॅशनल बँकेने वकिलामार्फत नोटीसा पाठवायला सुरुवात केली. यासंदर्भात न्याय न मिळाल्याने आज पुण्यातील पंजाब नॅशनल बँकेच्या कॅम्पमधील विभागीय कार्यालयासमोर अर्ध नग्न आंदोलन करण्यात आलं. याबाबत बँक मॅनेजर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. रस्त्यावर मागितलेली भीक बँकेला व संजय शिंदेला देण्यात आलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com