

water supply close
पुणे - पर्वती जलशुद्धीकरण केंद्रांतर्गत येणाऱ्या विविध जलकेंद्रांमधील विद्युत आणि स्थापत्यविषयक तातडीच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी जवळपास अर्ध्या शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी (ता. १०) बंद असणार आहे. शुक्रवारी (ता.११) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केली आहे.