कोरोनामुळे नारळ उत्पादकांसह व्यावसायिकांना फटका; नवरात्रात मागणी निम्म्याने घटली

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 21 October 2020

सध्या नवरात्रौत्सव सुरु आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मंदीरे, देवस्थाने बंद आहेत. नवरात्रौत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला जात आहे. त्यामुळे नवरात्र असूनही नारळाला मागणी कमीच आहे. नवरात्रौत्सवामुळे नारळाला गेल्या आठवड्यात काही प्रमाणात मागणी होती तसेच दसऱ्यापर्यंत काही प्रमाणात मागणी राहील. मात्र त्यानंतर मागणी कमी होईल. परंतु ही मागणी मागील वर्षीच्या निम्मीच आहे. दसरा झाल्यानंतर काही प्रमाणात भाव कमी होतील असा अंदाज आहे. 

मार्केट यार्ड: दरवर्षी नवरात्रोत्सवात नारळाला मोठी मागणी असते. परंतु, यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे नवरात्रोत्सव सध्या पद्धतीने होत आहे. त्यामुळे नारळाच्या मागणीत निम्म्याने घट झाली आहे. परंतु,  नारळ उत्पादित क्षेत्रात पावसाने झालेल्या नुकसानीमुळे नारळाच्या भावात शेकड्यामागे २०० रुपयांनी वाढ झाली आहे.
 
याबाबत दि पूना मर्चंटस चेंबरचे माजी अध्यक्ष आणि नारळाचे व्यापारी दीपक बोरा म्हणाले की, तामिळनाडू, आंध्रप्रदेशात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. नारळाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नारळाच्या भावात शेकड्यामागे २०० रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने नारळ व्यावसायाला मोठा फटका बसला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा एकंदरीतच पन्नास टक्क्यांनी मागणी घटली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 
सध्या नवरात्रौत्सव सुरु आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मंदीरे, देवस्थाने बंद आहेत. नवरात्रौत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला जात आहे. त्यामुळे नवरात्र असूनही नारळाला मागणी कमीच आहे. नवरात्रौत्सवामुळे नारळाला गेल्या आठवड्यात काही प्रमाणात मागणी होती तसेच दसऱ्यापर्यंत काही प्रमाणात मागणी राहील. मात्र त्यानंतर मागणी कमी होईल. परंतु ही मागणी मागील वर्षीच्या निम्मीच आहे. दसरा झाल्यानंतर काही प्रमाणात भाव कमी होतील असा अंदाज आहे. 

यामुळे घटली मागणी
- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नवरात्रोत्सव सध्या पद्धतीने
- सर्व मंदीरे, देवस्थाने बंद
- पुजेच्या साहित्यांचा व्यवसाय करणारे छोटे व्यावसायिक संकटात
-  केवळ घरातील देवींकरीताच नारळाची मागणी

आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांतून मार्केट यार्डात नारळाची आवक होते. धार्मिक कार्यक्रमांमध्ये पूजा व तोरणासाठी नव्या नारळाला मागणी राहते. तर, हॉटेल व्यावसायिकांकडून मद्रास आणि सापसोल नारळाला मोठी मागणी असते.

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दरवर्षी नवरात्रौत्सवात १२ ते १५ लाख नारळांची शहरात विक्री होते. मात्र यंदा त्यामध्ये घट झाली असून ८ ते ९ लाख नारळांचीच विक्री होईल. एकंदरीतच यंदा नारळ उत्पादक आणि व्यावसायिकांपुढे संकट उभे राहीले आहे़ नारळाचा नविन हंगाम संक्रांतीनंतर सुरु होतो त्यानंतर नारळाचे भाव कमी होतील.

घाऊक बाजारातील नारळाचे दर
नारळाचा शेकडा दर
नवा नारळ १७०० ते १८००
सापसोल १८०० ते २८००
पालकोल १८५० ते १९५०
मद्रास २८०० ते २९००

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: halved the demand for coconut on Navratri due to corona