esakal | 'दोन नंबर संस्कृती' ही कोरोनापेक्षा भयानक; बाबा आढावांची खरमरीत टीका
sakal

बोलून बातमी शोधा

Baba_Adhav

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालयासमोर सोमवारी (ता. 26) हमाल पंचायत संघटनेने धरणे आंदोलन केले. यावेळी आढाव बोलत होते.

'दोन नंबर संस्कृती' ही कोरोनापेक्षा भयानक; बाबा आढावांची खरमरीत टीका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मार्केट यार्ड (पुणे) : बाजारात येणारी मालाची आवक आणि जावाक यावर बाजार समितीने नेमलेल्या तोलणारांचे नियंत्रण असते. त्यामुळेच व्यापाऱ्यांना तोलणार नको आहेत. वर्षानुवर्षे बाजारात दोन नंबर संस्कृती रुजलेली आहे. परंतु न्याय देण्यासाठी दोन नंबरचा व्यापार बंद व्हायला हवा आहे. दोन नंबर संस्कृती ही कोरोनापेक्षा भयानक आहे, असे मत ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांनी व्यक्त केले.

अकरावी अॅडमिशन: दीड महिन्यांपासून रखडलेली प्रक्रिया तत्काळ चालू करा; अभाविपचं आंदोलन​

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालयासमोर सोमवारी (ता. 26) हमाल पंचायत संघटनेने धरणे आंदोलन केले. यावेळी आढाव बोलत होते. कामगार संघटनेचे सचिव संतोष नांगरे, गोरख मेंगडे, हनुमंत बहिरट, किशोर भानुसगिरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कामगार उपस्थित होते. आढाव म्हणाले, भुसार बाजारातील व्यापाऱ्यांनी तोलणारांना काम देणे बंद केले आहे. काम बंद करणे हे न्यायालयाच्या विरुद्ध आहे. पूर्ववत काम द्या, असे न्यायलयाने सांगितले आहे. तोलणार हा घटक सरकारने निर्माण केलेला आहे. तो घटक आवश्यक असल्याचा निर्णय सरकारनेदेखील घेतलेला आहे. तरीही व्यापारी त्यांना काम करू देत नाहीत. त्यामुळे ही धरणे आंदोलन करण्याची वेळ आली आहे.

शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी बाजार समिती संपता काम नये. त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. एक देश, एक बाजार या नावाखाली बाजार समिती संपवण्याचा घाट शासनाने घातला आहे. तसेच कोरोना काळात बाजार समिती आणि व्यापाऱ्यांनी बाहेरच्या घटकांना मदत केली; परंतु बाजारातील कामगारांना मदत केली नसल्याची खंत देखील आढाव यांनी यावेळी बोलून दाखविली.

श्रीमंत दगडूशेठ गणपतीला 85 तोळे सोन्याचा सुवर्णसाज!

बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात प्रशासक, चेंबरचे पदाधिकारी, आणि तोलणार, हमाल पंचायत यांच्यामध्ये बैठक झाली. येणाऱ्या २९ तारखेला तोलाई संदर्भात न्यायलायात सूनवणी आहे. त्या ठिकाणी जो निर्णय होईल तो सर्वांना मान्य असेल असे ठरले आहे.
- पोपटलाल ओस्तवाल, अध्यक्ष, दि पूना मर्चंट चेंबर.

निवडणूक न होणे हा लोकशाही देशाचा पराभव
मागील अनेक महिन्यांपासून व्यापारी काम देत नाहीत. तरीही त्यांच्यावर कारवाई होत नाही. हे एक राजकीय धोरण असू शकते. मागील अनेक वर्ष सातत्याने प्रशासक नेमावा लागणे. निवडणूक न होणे हा लोकशाही देशाचा पराभव असल्याचे आढाव यावेळी म्हणाले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top