नागरगावात साडेतीन एकर उसाला आग

नागरगावात साडेतीन एकर उसाला आग
Published on

आंधळगाव, ता. १३ : नागरगाव व आंधळगाव (ता.शिरूर) परिसरात मुख्य विद्युत वाहक तारांमध्ये घर्षण होऊन पडलेल्या ठिणग्यांमुळे मंगळवारी (ता.१२) भीषण आग लागली. यामध्ये चार एकर ऊस जळाला.तसेच एका ठिकाणी कांद्याच्या एरणीलाही आग लागल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या घटनेमुळे वीज वितरण विभागाच्या निष्काळजीपणाबद्दल
शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंधळगाव ते नागरगाव परिसरातून गेलेल्या मुख्य उच्चदाब वीजवाहक तारांमध्ये मंगळवारी दुपारी जोरदार घर्षण झाल्याने अचानक तीन ठिकाणी ठिणग्या पडल्या. परिसरात उष्णतेची तीव्र लाटेमुळे ठिणग्यांमुळे काही क्षणांतच उसाच्या शेतांनी पेट घेतला. आग इतक्या वेगाने पसरली की शेतकऱ्यांना सुरुवातीला काहीच समजण्याआधी मोठ्या प्रमाणात ऊस जळू लागला.
सुनंदा हिरामण शेलार यांच्या शेतातील विद्युत रोहित्रातून ठिणग्या उसात पडल्याने दोन एकर क्षेत्रातील उसाचे नुकसान झाले. तसेच लगत असलेला भानुदास जयसिंग शेलार यांचा सुमारे दीड एकर ऊस पूर्णतः जळून खाक झाला. आंधळगाव येथील राजाराम कुसेकर यांच्या अर्धा एकर उसालाही आगीचा फटका बसला.
मुख्य विद्युत वाहक तारांखाली असलेल्या उद्धव शितोळे यांच्या कांद्याच्या एरणीवर ठिणग्या पडल्याने तिने पेट घेतला. मात्र शितोळे व ग्रामस्थांनी तातडीने पाणी व मातीच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली.
दरम्यान, शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. तसेच जुन्या व सैल झालेल्या वीजवाहक तारांची तातडीने दुरुस्ती करून अशा घटना टाळाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.


प्रशासनाचा निष्काळजीपणा शेतकऱ्यांंच्या मूळावर
जीर्ण वायरिंग आणि रोहित्रांची वेळेवर देखभाल न केल्याने या दुर्घटना घडत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मेंटेनन्स न केलेले रोहित्र आणि लोबकळणाऱ्या तारांच्या घर्षणामुळे आगी लागत आहेत. महावितरणने याची जबाबदारी स्वीकारून तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी घोडगंगाचे माजी संचालक अनिल शेलार यांनी केली आहे.

03120

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com