दिव्यांग युवकाच्या जिमची 'अनटोल्ड स्टोरी'

Handicapped Tinkesh Kaushik from Pune has opened his own gym
Handicapped Tinkesh Kaushik from Pune has opened his own gym

पुणे : अवघ्या नऊ वर्षांचे असताना झालेल्या अपघातात टिंकेश कौशिक यांनी तीन अवयव गमाविल्याने त्यांना आयुष्यभराचे अपंगत्व आले. मात्र त्यावर मात करत त्यांनी योग शिक्षक आणि फिटनेस कोच म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आरोग्यप्रेमी असलेल्या टिंकेश यांनी आपल्यासारख्या दिव्यांगांसाठी एक अनोखी आणि आधुनिक उपकरणांनी सुसज्ज जिम उघडली आहे. व्हीलचेअर वापरणाऱ्यांसाठी योग्य व्यवस्था करून व्यायामशाळेला सर्वसमावेशक व अनुकूल बनवण्यासाठी टिंकेश यांची धडपड सुरु आहे.

टिंकेश हे मूळचे हरियाना येथील झज्जर गावातले असून ते पुण्यात स्थायिक झाले आहेत. स्मिता गौतम यांच्या मार्गदर्शनाखाली इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन अँड फिटनेस सायन्सेस (आयएनएफएस) येथून त्यांनी फिटनेस कोचचे प्रशिक्षण पूर्ण केले. टिंकेश म्हणाले, लहानपणी झालेल्या एका अपघातात मी गुडघ्याखालचे दोन्ही पाय आणि डावा खांदा गमविला. या दुर्घटनेनंतर मी दोन वर्ष एकाच जागी होतो. हालचाल करता येत नसल्याने शाळेत जाता आले नाही. मात्र कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे जगण्याची नवी उमेद मिळाली. ११ व्या वर्षी मला कृत्रिम पाय बसविण्यात आल्यामुळे स्वतः बाहेर फिरण्यास सुरवात केली. एकांकीपणेतून बाहेर येत पदवीपर्यंतचे शिक्षण सुद्धा पूर्ण करता आले. या काळात मी अनेक मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेत स्वतःला सिद्ध करत गेलो. त्यामुळे आरोग्य आणि तंदुरुस्तीच्या क्षेत्राची आवड निर्माण झाली.

"लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद

नोव्हेंबर 2018 मध्ये काठमांडू येथे टिंकेशने एक नवीन विक्रम स्थापित केला. त्यांनी जगातील सर्वांत जास्त उंचीचे 'स्विंग साइट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  'द लास्ट रिसॉर्ट'मध्ये 160 मीटर उंचीवरून उडी मारत बन्जी जम्प केले. यासाठी त्यांच्या नावाची नोंद 2020 मध्ये लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली. तर, भारत प्रेरणा पुरस्कारासह विविध पुरस्कार त्यांनी जिंकले आहेत.

यामुळे सुरू केली जिम 

सर्वसामान्यांसाठी अनेक जीव व प्रशिक्षक उपलब्ध आहेत. मात्र दिव्यांगांना बॉडी किंवा सामान्य लोकांप्रमाणे शारीरिक तंदुरुस्तीसाठी जिममध्ये जाताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यांची ही अडचण दूर करण्यासाठी जिम सुरू केली असून आवश्‍यक असलेली उपकरणे जिममध्ये उपलब्ध करून दिले आहेत.

हातपाय गमावल्यानंतरही एक धावपटू, जलतरणपटू, पॅरा सायकलपटू, मॅरेथॉन आणि फिटनेस प्रेमी बनलो आहे. माझ्या अपंगत्वामुळे माझ्या क्षमतांकडे बघण्यासाठी मला प्रेरणा मिळाली. प्रत्येक दिव्यांगाने जगाला हे दाखवून दिले पाहिजे की आपली इच्छा शक्ती सक्षम असल्यास काहीही अशक्‍य नाही.
- टिंकेश कौशिक, फिटनेस कोच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com