
सिंहगड किल्ल्याच्या पश्चिम बाजूस मालखेड-थोपटेवाडी (ता. हवेली) रस्त्यावरील पुलाखाली मृतदेह मिळालेल्या दोन वर्षांच्या निरागस चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे व त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी संजय बबन काटकर (वय 38, रा. कादवे ता. वेल्हे, जि.पुणे) या नराधमाला रायगड जिल्ह्यातून अटक करण्यात आली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
किरकटवाडी - सिंहगड किल्ल्याच्या पश्चिम बाजूस मालखेड-थोपटेवाडी (ता. हवेली) रस्त्यावरील पुलाखाली मृतदेह मिळालेल्या दोन वर्षांच्या निरागस चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे व त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी संजय बबन काटकर (वय 38, रा. कादवे ता. वेल्हे, जि.पुणे) या नराधमाला रायगड जिल्ह्यातून अटक करण्यात आली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. चिमुरडीवर झालेल्या अत्याचारामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून सिंहगड परिसर सुन्न झाला आहे. दरम्यान, 2 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या त्या नराधमाला फाशी द्या अशी मागणी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगिता तिवारी यांनी केली आहे. कुरण येथील कातकरी वस्तीवर जाऊन तिवारी यांनी पिडीत कुटुंबाची भेट घेतली.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
15 फेब्रुवारी रोजी पानशेत जवळील कुरण खुर्द (ता. वेल्हे जिल्हा पुणे) येथे आपल्या घरासमोर खेळत असलेल्या आदिवासी कातकरी समाजातील दोन वर्षांच्या मुलीचे एका अज्ञात व्यक्तीने रिक्षातून अपहरण केले होते. याबाबत वेल्हे पोलिस ठाण्याला माहिती देण्यात आली होती. काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मुलीला मालखेड परिसरात घेऊन आल्याचे समजताच वेल्हे व हवेली पोलिस ठाण्याकडून कसून शोधकार्य सुरू होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख हे स्वतः मलखेड परिसरात 16 फेब्रुवारी रोजी तपासावर लक्ष ठेवून होते.
श्वानपथक व पुणे ग्रामीण पोलीस दलातील शेकडो पोलीस कर्मचारी मालखेड व आजूबाजूचा परिसर पिंजून काढत असताना मालखेड-थोपटेवाडी रस्त्यावरील पुलाखाली चिमुरडीचा मृतदेह आढळून आला. शवविच्छेदन अहवालातून या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. आरोपीच्या शोधासाठी वेल्हे, हवेली, राजगड, भोर आणि पौड पोलिस ठाण्यांची मिळून एकूण अकरा तपास पथके तैनात करण्यात आली होती. या नराधमाला रायगड जिल्ह्यातून अटक करण्यात आली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. चिमुरडीवर झालेल्या अत्याचारामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून सिंहगड परिसर सुन्न झाला आहे.
Edited By - Prashant Patil