खुडूसचा पै. हनुमंत जाधव यांची जागतिक कुस्ती स्पर्धसाठी निवड , कु राजेश्वरी ठवरे हिची नॅशनल कुस्ती स्पर्धत कास्य पदकाची कमाई ,

खुडूसचा पै. हनुमंत जाधव यांची जागतिक कुस्ती स्पर्धसाठी निवड , कु राजेश्वरी ठवरे हिची नॅशनल  कुस्ती स्पर्धत कास्य पदकाची कमाई ,
Published on

MLS26B02819
हनुमंत जाधव
---
MLS26B02820
राजेश्वरी ठवरे
---
खुडूसच्या हनुमंतची वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी निवड
गोदबा पाटील कुस्ती केंद्राचे यश; राष्ट्रीय स्पर्धेत राजेश्वरीला कांस्यपदक
सकाळ वृत्तसेवा
माळशिरस, ता. २६ : गोदबा पाटील प्रतिष्ठान संचलित खुडूस येथील कुस्ती प्रशिक्षण केंद्राचा मल्ल हनुमंत जाधव याची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच राजेश्वरी महादेव ठवरे हिने ६१ किलो वजनी गटात राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक पटकावत खेलो इंडिया स्पर्धेसाठी पात्रता मिळविली. या स्पर्धा लखनौ (उत्तर प्रदेश) येथे झाल्या.
१७ वर्षांखालील ४५ किलो वजनी गटातील वर्ल्ड चॅम्पियनशिप निवड चाचणीत हनुमंत जाधवने दिल्लीच्या सूर्य फोगट, हरियानाच्या वंश आणि अंतिम फेरीत हरियानाच्या साहिल यांचा पराभव करून अझरबैजानमधील (बाकू) जागतिक कुस्ती स्पर्धेतील स्थान निश्चित केले. या यशाबद्दल पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार राम सातपुते, श्री श्री साखर कारखान्याचे अध्यक्ष शेषागिरीराव, विक्रमसिंह शिंदे, जिल्हा परिषद कृषी सभापती संजय पाटील यांनी अभिनंदन केले. गोदबा पाटील कुस्ती केंद्रात सुमारे २०० मल्ल सराव करतात. हनुमंत जाधव व राजेश्वरी ठवरे यांना एनआयएस कुस्ती प्रशिक्षक पै. महादेव ठवरे, बापूराव ठवरे, किरण मोरे, सागर वाघ व तुषार झंजे यांचे मार्गदर्शन लाभले.
---
चौकट
पै. हनुमंत जाधव हा माढा तालुक्यातील चांदज येथील असून, तो खुडूस येथील गोदबा पाटील कुस्ती प्रशिक्षण केंद्रात सराव करतो. अत्यंत गरीब कुटुंबातील असलेल्या हनुमंतच्या सरावासाठी त्याचे आई-वडील मोलमजुरी करून खुराकाची व्यवस्था करतात. शासनाने त्याच्या गुणवत्तेची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. माढ्याचे विक्रमसिंह शिंदे यांनी त्याचा सत्कार करून ५५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com