#HappyNewYear2020 ‘ट्‌वेंटी ट्‌वेंटी’ चा फीव्हर...

20-20
20-20
Updated on

पुणे - सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाच्या, अर्थात ‘ट्‌वेंटी ट्‌वेंटी’च्या स्वागतासाठी आतुर झालेली तरुणाई, सेलिब्रेशन डेस्टिनेशन, जुन्या-नव्या मित्रांचा गोतावळा पार्टीचे बेत आखत ‘थर्टी फर्स्ट’ आणि ‘न्यू इयर’च्या सेलिब्रेशनचा फीव्हर अवघ्या शहरात उतरला आहे. नव्या संकल्पनांसह ‘ट्‌वेंटी ट्‌वेंटी’तील पर्दापणाचा निर्धारही तरुणाईचा आहे. त्याच वेळी हौशी नागरिकांच्या पसंती उतरण्याकरिता हॉटेल, क्‍लब, पब, केक शॉपसह खाद्यपदार्थ व्यावसायिकांनीही तयारी केली आहे.

सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस म्हणून सोमवारपासूनच ‘थर्टी फर्स्ट’चा जोश सर्वत्र जाणवतो आहे. घरगुती छोटेखानी कार्यक्रमांसोबत सोसायटी, नातेवाइकांना एकत्र आणून नव्या वर्षाच्या स्वागताची लगबग सुरू आहे. तेव्हाच हवेतील गारठाही वाढल्याने शहरालगतची हॉटेल, फार्म हाउस गाठून मस्त हुर्डा पार्टी, गावरान जेवणासाठी आपली पसंती दिल्याचे त्यांच्याशी बोलल्यानंतर जाणवले. अशा खास या पार्ट्यांसाठी फॅन्सी ड्रेस, तोही ग्रुपसाठी एकच असावा; जेणेकरून फोटोसेशन करता येईल, याचेही नियोजन केल्याचे दिसून आले. फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, कोरेगाव पार्क, विमाननगर, खराडी, कॅम्प आणि हिंजवडीसारख्या भागातील हॉटेल पार्ट्यांसाठी आधीच ‘बुक’ झाले आहेत.  

सायली पाटील म्हणाली, ‘‘प्रत्येक वर्षी थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी आम्ही शॉर्ट ट्रिप अथवा शहराबाहेर जातो. यंदाच्या वर्षीही मित्रांसोबत ट्रेकिंगसाठी बाहेर जाणार आहे.’’ 

महिलांसाठी खास सवलती
नव्या वर्षानिमित्त आपल्या खास ग्राहकांसाठी व्यावसायिकांनी सवलतही जाहीर केल्या आहेत. विशेषत: महिलावर्गासाठी ‘ब्युटी पार्लर’, बुटिक्‍स, फुटवेअर आणि केक शॉपमध्ये ३० ते ४० टक्के सवलत मिळणार आहे. त्यात ब्युटी पार्लरमधील पॅकेजला महिलांची पसंती असल्याचे दिसून आले.

वाहतुकीत बदल
नववर्षाच्या स्वागतानिमित्त मंगळवारी रात्री शहरातील विविध रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. त्यादृष्टीने शहरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. कॅम्प व फरासखाना वाहतूक विभागातील वाहतुकीमध्ये बदल असणार आहे. मंगळवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून बुधवारी पहाटे गर्दी संपेपर्यंत शहरातील सर्व सिग्नल सुरू राहणार आहेत. त्यादृष्टीने वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा व वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.

सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर गर्दी करतात.  त्यांना नववर्षाचा आनंद घेता यावा, वाहतूक कोंडी होऊ नये, या दृष्टीने वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले असल्याचे  वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू यांनी सांगितले.  

नववर्षानिमित्त दगडुशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे शिवाजी रस्त्यावर चारचाकी वाहनांना बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंदी असणार आहे. त्यानुसार वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

शिवाजी रस्त्यावरील उद्याचा बदल
  स. गो. बर्वे चौक ते स्वारगेट मार्गावरील वाहतूक स. गो. बर्वे चौक, जंगली महाराज रस्त्यामार्गे खंडोजीबाबा चौक, टिळक चौक, टिळक रस्त्याने इच्छित स्थळी जाईल. 

  स. गो. बर्वे चौक ते मनपा मार्गावरील वाहतूक स. गो. बर्वे चौक, जंगली महाराज रस्तामार्गे झाशीची राणी चौक येथून डावीकडे वळून मनपाकडे जातील.

कॅम्प परिसरातील वाहतुकीमध्ये बदल
  वाय जंक्‍शनवरून एम. जी. रोडकडे येणारी वाहतूक १५ ऑगस्ट चौक येथे बंद असेल. ती कुरेशी मशीद व सुजाता मस्तानी चौकातून पुढे जाईल

  इस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे

  व्होल्गा चौकाकडून महम्मद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून, संबंधित वाहतूक सरळ ईस्ट स्ट्रीट रोडने इंदिरा गांधी चौकातून पुढे जाईल

  इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद असेल. संबंधित वाहतूक इंदिरा गांधी चौकातून लष्कर पोलिस ठाणे चौकाकडे वळविण्यात येणार आहे. सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद असेल. ती ताबूत स्ट्रीटमार्गे पुढे सोडण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com