Hapus Mango : गुढीपाडव्याला आंबा होणार महाग! यंदा हापूस उत्पादनात तब्बल ७० टक्क्यांनी घट

कोकणातील आंबा उत्पादनात तब्बल ६० ते ७० टक्क्यांची घट झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
Hapus Mango
Hapus Mangoesakal
Updated on

मार्केट यार्ड - मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदाचा हापूस आंबा हंगाम अत्यंत अस्थिर आहे. कोकणातील आंबा उत्पादनात तब्बल ६० ते ७० टक्क्यांची घट झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

हवामानातील सातत्याने बदलणारे स्वरूप, परतीच्या पावसाचा परिणाम, तसेच थ्रिप्स आणि तुडतुड्या (हॉपर) या किडींच्या प्रादुर्भावामुळे आंबा बागायतदार मोठ्या संकटात सापडले आहेत. त्यामुळे यंदा पाडव्याच्या मुहूर्तावर हापूसचा तुटवडा भासणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com