Har Ghar Tiraga : महाराष्ट्रातील सर्वात मोठा तिरंगा पुण्यातील बाणेरमध्ये

Har ghar tiranga
Har ghar tiranga Sakal

Har Ghar Tiraga : 'आझादी का अमृतमहोत्सव'च्या औचित्याने 'हर घर तिरंगा' उपक्रमांतर्गत देशभरात उत्साहाचे वातावरण असून, पुण्यातील बाणेर येथे 'नेटसर्फ नेटवर्क'च्या वतीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा तिरंगा ध्वज लावण्यात आला आहे. १२० फूट बाय ४० फूट इतक्या भव्य आकाराचा तिरंगा ध्वज 'नेटसर्फ'ने आपल्या मुख्य कार्यालयाला लावत राष्ट्राला विक्रमी आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी सलामी दिली आहे.

Har ghar tiranga
ऑनर किलिंगने जळगाव हादरलं; भावाकडून बहिणीसह प्रियकराची ह्त्या

शुक्रवारी (१२ ऑगस्ट) 'नेटसर्फ' परिवाराने त्यांच्या बाणेर येथील मुख्यालयात एकत्र येत त्यांच्या संपूर्ण इमारतीला बाहेरून हा तिरंगा लावला. या भव्य तिरंगा ध्वजाचे अनावरण राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाले. हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या तिरंग्यांपैकी एक आहे. या तिरंग्याने त्याच्या प्रत्येक साक्षीदाराच्या मनात आपल्या देशाबद्दलचे प्रेम आणि अभिमान पुन्हा नव्याने जागवला आहे. नेटसर्फ कंपनीनेही आपल्या गेल्या २२ वर्षांच्या कारकिर्दीत हजारो भारतीयांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यास मदत करून त्यांच्या उद्योजकतेस प्रोत्साहन दिले आहे.

Har ghar tiranga
Independence Day 2022: पौष्टिक झटपट तिरंगी इडल्या कशा तयार करायच्या?

चंद्रकांत पाटील म्हणाले, "अनोख्या पद्धतीने राष्ट्राला वंदन करण्याचा नेटसर्फ नेटवर्कचा प्रयत्न स्तुत्य आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देशभरात उत्साहात साजरा होत असून, भारतीयांच्या कल्पकतेने 'हर घर तिरंगा' या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे, याचा आनंद वाटतो. इमारतीच्या भोवती सर्वात मोठा ध्वज लावल्याचा मला आनंद झाला."

जर व्यक्तींना योग्य संधी आणि व्यासपीठ मिळाले तर त्या त्यांचा कौशल्य विकास करून स्वत:ची स्वप्ने पूर्ण करू शकतात असे मत नेटसर्फ कंपनीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी सुजित जैन यांनी व्यक्त केले. यावेळी नेटसर्फ नेटवर्कचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक सुजित जैन, ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. एस के जैन, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, पुनीत जोशी, संदीप खर्डेकर, संजय मालपाणी, शैलेंद्र कवडे, मनोज पोचट, केतन गानू, प्रदीप टेटे आदी मान्यवर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com