पुणे - तिरंगा हातात घेतल्यानंतर केवळ अधिकारांची जाणीव न ठेवता संविधानाने सोपविलेली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांचीही जाणीव तरुणांनी ठेवली पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले..‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत पुण्यात आयोजित तिरंगा यात्रेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात यात्रेचा समारोप झाला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजूषा नागपुरे, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे आदी यावेळी उपस्थित होते..फडणवीस म्हणाले, ‘या तिरंग्यासाठी देशातील अनेक स्वातंत्र्यसैनिक आणि जवानांनी बलिदान दिले. त्यांच्या त्यागामुळे आज आपण तिरंगा अभिमानाने फडकवू शकतो. देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांचे स्मरण प्रत्येकाने केले पाहिजे. पुणे ही जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक आणि क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या विचारांची भूमी आहे. या भूमीतील तरुणाईच्या सामर्थ्यावर विकसित महाराष्ट्र घडवायचा आहे. तरुणांच्या स्वप्नांना बळ आणि पंख देणारा, समतेचा आणि प्रगतीचा महाराष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प करूया, असेही त्यांनी सांगितले.भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला असून, शस्त्रनिर्मितीतही देश सक्षम होत आहे, असेही फडणवीस म्हणाले..फडणवीस म्हणाले -- ज्या रस्त्यावर तरुणांचे गप्पांचे कट्टे रंगतात तेथे आज तिरंग्याचा महापूर आला आहे.- शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील तरुणाई नवभारताच्या उत्थानासाठी सज्ज- शहीदांच्या बलिदानाचे कायम स्मरण ठेवावे- तरुणांच्या सामर्थ्यावर विकसित भारतासह विकसीत महाराष्ट्र घडणार- पुणे ही महाराष्ट्राची इनोव्हेशन नगरी, भारताचे बलस्थान आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.