

एसजीएमतर्फे आयोजित
रॅलीत १२०० विद्यार्थी
कऱ्हाड ः येथील सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यानगर परिसरात ‘हर घर तिरंगा’ रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये महाविद्यालयातील १२०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन देशभक्तिपर घोषणांच्या माध्यमातून परिसरात राष्ट्रभक्तीचा संदेश दिला. रॅलीच्या नियोजनासाठी व वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कऱ्हाड वाहतूक पोलिसांनी सहकार्य केले.
या उपक्रमासाठी सायबर सिक्युरिटी पोलिसचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. एनसीसी, एनएसएस, महाविद्यालयीन आरोग्य केंद्र व जिमखाना विभागाच्या सहकार्याने रॅली व विविध जनजागृती विषयक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी ‘हर घर तिरंगा रॅली’, ‘टीबीमुक्त भारत रॅली’, ‘सायबर सुरक्षा व जनजागृती रॅली’, ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षानिमित्त समूहगायन, ‘सेल्फी विथ तिरंगा’ आदी विविध उपक्रमांचे आयोजन केले.
W42294
सैदापूर ः तिरंगा रॅलीत सहभागी विद्यार्थी, शिक्षक.
----------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.