पुणे : नवऱ्याकडूनच हनीमूनचे फोटो व्हायरल करण्याची धमकी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 23 February 2020

हनिमूनचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेचा छळ 

पिंपरी : विवाहितेच्या  हनिमुनचे व त्यांच्या बहिणीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी सासरच्या मंडळींनी दिली. तसेच 19 लाख रुपये, 80 तोळे सोने व कंपनीत गुंतविलेले शेअर्स घेऊन फसवणूक करीत विवाहितेचा छळ केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याप्रकरणी 29 वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती  रमीज कुणी मोनू (वय 33(, सासू झुबेदा कुणी मोनू (वय 56), सासरा कुणी मोनू (वय 71), नणंद रुतबा अब्दुल हसन टोनसे हवालदार (वय 34), अब्दुल टोनसे हवालदार (वय 39), मावस नंदन सफिया अली (वय 45 , सर्व रा. कर्नाटक )यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने फिर्यादीकडून त्यांचा मोबाईल फोन जबरदस्तीने घेतला.

एक वर्षाच्या बाळाला घेऊन महिला कॉन्स्टेबल करतेय ट्रम्प यांच्या सुरक्षेचे काम

मोबाईलमधील माहिती व आरोपीकडील कागदपत्रांच्या आधारे फिर्यादी व त्यांच्या मुलीच्या बँक खात्यातील 19 लाख रुपये ट्रान्सफर करून घेतले. तसेच फिर्यादी यांच्या नावावर एका कंपनीत शेअर होते ते देखील ट्रान्सफर करून घेतले. फिर्यादी यांच्या आई-वडिलांनी लग्नात दिलेले 80 तोळ्याचे सोन्याचे दागिने लॉकरमध्ये ठेवण्याच्या बहाण्याने घेतले. मात्र ते देखील परत न देता फसवणूक केली. तसेच पत्नी व सासूने वेगवेगळ्या कारणांवरून त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच फिर्यादी यांच्या हनिमूनचे व त्यांच्या बहिणीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: harassment by Husbund threatens to go viral photos of honeymoon

Tags
टॉपिकस
Topic Tags: