Cyber Crime
sakal
पुणे - बहुतांश सायबर गुन्ह्यांचे मूळ म्हणजे मोबाईलवर आलेली एखादी संशयास्पद लिंक किंवा ‘एपीके’ फाइल. ही लिंक किंवा फाइल तुमच्या कष्टाची कमाई काही क्षणांत लंपास करू शकते. वीज बिल, गॅस बिल, लॉटरी, केवायसी किंवा कुरिअरच्या बहाण्याने मोबाइलचा रिमोट ॲक्सेस मिळवून नागरिकांना लुटणाऱ्या सायबर टोळ्या सध्या सक्रिय आहेत. शहरात अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असून, सायबर पोलिसांसमोर याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.